उंबरठ्यावर माप ठेविले
उंबरठ्यावर माप ठेविले
मी पायाने उलथुनि आले
आले तुझिया घरी
कराया तुझीच रे चाकरी
माहेराची माया तोडुनी
इकडे आले सख्या धावुनी
वृत्ति होई बावरी
कराया तुझीच रे चाकरी
फुलासारखी घरी वाढले
आईने ओंजळीत धरले
अश्रू येता दुरी
कराया तुझीच रे चाकरी
तुझे चरणरज लाविन भाळी
तुझीच गाईन मी भूपाळी
हात तुझे गळसरी
कराया तुझीच रे चाकरी
मी पायाने उलथुनि आले
आले तुझिया घरी
कराया तुझीच रे चाकरी
माहेराची माया तोडुनी
इकडे आले सख्या धावुनी
वृत्ति होई बावरी
कराया तुझीच रे चाकरी
फुलासारखी घरी वाढले
आईने ओंजळीत धरले
अश्रू येता दुरी
कराया तुझीच रे चाकरी
तुझे चरणरज लाविन भाळी
तुझीच गाईन मी भूपाळी
हात तुझे गळसरी
कराया तुझीच रे चाकरी
गीत | - | मनमोहन नातू |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | सरोज वेलिंगकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
गळसर | - | कंठात घालायचा स्त्रियांचा एक दागिना. |
रज | - | धूळ. |