उतरली सांज ही धरेवरी
उतरली सांज ही धरेवरी
मी उभी घेउनी कलश करी
सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जल लहरीवर
करीत व्याकुल माझे अंतर
मज साद घालतो परोपरी
उरे शांतता या पथी निर्जन
प्रेमनदीला भरती येउन
उठती लहरी चंचल उसळून
ही वळती पाऊले तटावरी
येईन का मी नाही परतुन?
तिथेच कोणा राहिन बिलगुन?
वीणा वाजवी कुणीतरी मोहन
तो नाद अनोखा घुमे उरी
मी उभी घेउनी कलश करी
सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जल लहरीवर
करीत व्याकुल माझे अंतर
मज साद घालतो परोपरी
उरे शांतता या पथी निर्जन
प्रेमनदीला भरती येउन
उठती लहरी चंचल उसळून
ही वळती पाऊले तटावरी
येईन का मी नाही परतुन?
तिथेच कोणा राहिन बिलगुन?
वीणा वाजवी कुणीतरी मोहन
तो नाद अनोखा घुमे उरी
गीत | - | सूर्यकान्त खाण्डेकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |