ऊठ मुकुंदा हे गोविंदा
ऊठ मुकुंदा, हे गोविंदा, मनरमणा सत्वरी
सख्या दाटला तव स्नेहाचा पान्हा माते उरीं
विहंगवर गगनांत विहरती गात तुला स्वागतें
दंवबिंदूंनीं नटुनी अवनी आनंदे हांसते
शेवंती दरवळली रानीं फुलला बघ केवडा
प्राजक्ताच्या मृदु पुष्पांचा पडला दारीं सडा
धुंद वाहतो गंध निवळलें चन्द्राचे चान्दणें
रांगोळ्यांनी सजूं लागलीं गोकुळिंची अंगणें
गोपी यमुनाजला चालल्या कुंभ सवें घेउनी
वनीं निघाल्या गोपालांचा श्रवणीं पडतो ध्वनी
मंथन करतां व्रजललनांची किणकिणती कंकणे
सडे शिंपितां व्रजबालांचीं रुणझुणती पैंजणें
तिष्ठति द्वारीं तुझे सौंगडे वाट तुझी पाहती
हे घननिळा, हे गोपाला, तुजला आवाहती

गीत | - | गो. नि. दांडेकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | राधामाई |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत |
व्रज | - | गवळ्यांची वाडी, समुदाय. |
विहंग | - | विहग, पक्षी. |