A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उठा राष्ट्रवीर हो

उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारूया खडे
एकसंघ होउनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होउनी धरू मुठीत भास्करा
होउनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊया, समर्थ होऊया चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्त वीर तो फिरून आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
गीत - रवीन्‍द्र भट
संगीत - सुधीर फडके
स्वर- अलंकार हुजूरबाजार
चित्रपट - हा माझा मार्ग एकला
गीत प्रकार - चित्रगीत, स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९६२.
अगस्ती - महाभारतात अगस्ती ऋषींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेला कालकेय हा दानव समुद्राच्या तळाशी जावून लपला. तेव्हा अगस्तींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयाला ठार मारले आणि देवांवरील संकट दूर केले.
भास्कर - सूर्य.
वायुपुत्र - मारुती. रामायणातील एक महत्वाचे पात्र. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.