A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत
करी हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवू

जरि हजार अमुच्या जाती
संकटामधे विरघळती
परचक्र येतसे जेव्हा
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष पंथ मतभेद आमुचे सागरात बुडवू

अन्याय घडो शेजारी
की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार
करू प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतील रक्त
जाळील आसुरी तख्त
स्वातंत्र्य-बंधुता-समता यांचा घोष सदा घुमवू
गीत - वसंत बापट
संगीत - वसंत बापट
स्वराविष्कार- लीलाधर हेगडे
दशरथ पुजारी, सुमन कल्याणपूर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• स्वर- लीलाधर हेगडे, संगीत- वसंत बापट.
• स्वर- सुमन कल्याणपूर, दशरथ पुजारी, आकाशवाणी गायकवृंद, संगीत- यशवंत देव.
आर्त - दु:ख, पीडा.
पुंड - भांडखोर / दांडगा.
संगीन - व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्‍यासारखे शस्‍त्र.

 

Random song suggestion
  लीलाधर हेगडे
  दशरथ पुजारी, सुमन कल्याणपूर