A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाट इथे स्वप्‍नातिल संपली

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनांत बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे बावरी तनू

दर्‍यांतुनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारितो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनू
राई - अरण्य, झाडी / मोहरी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.