A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नांदते गोकुळ या सदनात

नांदते गोकुळ या सदनात

बालरविची किरणे कोमल
माया मजवर घालिती प्रेमळ
फुलाफुलांतून नवखा परिमळ
वाजताच दारात

नंदनवन हे माझे जीवन
जणु का सागर-सरिता मीलन
मलाच गमते माझे भूषण
भरल्या संसारात