वादळाचा वेग घेउन
वादळाचा वेग घेउन चांदणे मी प्यायले
अन् सुखाचा साज सारा रोमरोमी ल्यायले
चंदनाचा गंध दाटे भारलेल्या अंतरी
पैंजणाच्या पाउलांनी रोज भिडले अंबरी
वाकलेल्या या नभाने विश्व माझे व्यापिले
मी जगावे सर्वकाळी रेशमी नात्यातुनी
गुंतला हा जीव आता या तुझ्या श्वासांतुनी
रे तुझ्या रूपातुनी मी ईश्वराला पाहिले
अन् सुखाचा साज सारा रोमरोमी ल्यायले
चंदनाचा गंध दाटे भारलेल्या अंतरी
पैंजणाच्या पाउलांनी रोज भिडले अंबरी
वाकलेल्या या नभाने विश्व माझे व्यापिले
मी जगावे सर्वकाळी रेशमी नात्यातुनी
गुंतला हा जीव आता या तुझ्या श्वासांतुनी
रे तुझ्या रूपातुनी मी ईश्वराला पाहिले
| गीत | - | राम मोरे |
| संगीत | - | श्रीनिवास खळे |
| स्वर | - | अपर्णा मयेकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अपर्णा मयेकर