A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वादळे उठतात किनारे

वादळे उठतात, किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगण्याच्या वळतात वाटा
सारंगा रे सारंगा !

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
हुंदके सरतात, आसवे उरतात
जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतू कोणते येत जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
थांबणे नसतेच, चालणे असतेच
रस्त्यांना फुटतोच फाटा
गीत - सौमित्र
संगीत - अशोक पत्की
स्वर- देवकी पंडित
चित्रपट - आईशप्पथ...!
गीत प्रकार - चित्रगीत
पिसे - वेड.
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.