A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदाचा कंद हरी हा

आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥

भक्तांसाठी । तो जगजेठी । भीमानिकटीं राहिला ॥

कंसभयानें । वसुदेवानें । नंदयशोदें वाहिला ॥

निश्चय साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणांनी मोहिला ॥
आनंदकंद - आनंदाचा उगम.
जगजेठी - जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर.
साच - खरे, सत्य.
नोंद
तुकारामांच्या 'आनंदाचा कंद गाइयेला गीतीं' या अभंगावर बाबाजीराव राणे यांनी संस्करण करून हे पद नाटकासाठी तयार केले. पुढे ते १९३२ सालच्या 'संत तुकाराम' उर्फ 'जय हरी विठ्ठल' या मास्टर आणि कंपनीच्या बोलपटात वापरले. मराठी बोलपटांसाठी लिहिलेले लेखन दिनांकाप्रमाणे हे पहिलेवहिले पटगीत होय.
- गंगाधर महाम्बरे

  पृथक्‌