रामाचें भजन तेंचि
रामाचें भजन तेंचि माझें ध्यान ।
तेणें समाधान पावईन ॥१॥
रामासी वर्णितां देहीं विदेहतां ।
जाली तन्मयता सहजचि ॥२॥
राघवाचें रूप तें माझें स्वरूप ।
तेणें सुखरूप निरंतर ॥३॥
रामदास ह्मणें मज येणें गती ।
राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
तेणें समाधान पावईन ॥१॥
रामासी वर्णितां देहीं विदेहतां ।
जाली तन्मयता सहजचि ॥२॥
राघवाचें रूप तें माझें स्वरूप ।
तेणें सुखरूप निरंतर ॥३॥
रामदास ह्मणें मज येणें गती ।
राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
| गीत | - | समर्थ रामदास |
| संगीत | - | राम फाटक |
| स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
| गीत प्रकार | - | राम निरंजन, संतवाणी |
| विदेहस्थिति | - | देहाचे भान विसरवणारी, मुक्त अशी अध्यात्मिक (ज्ञानी) अवस्था, निर्विकल्प. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












पं. भीमसेन जोशी