वहिनीसाहेब
कुळाचे कौतुक जिवांचा आधार
सुखाचे आगर मायेचे माहेर
देह तुळशीचा वसा चंदनाचा
शब्द करुणेचा शोधी ओठांवर
समई होऊन संसारी नांदते
पक्षीण होऊन पिलांना पाहते
गावाची माउली वडाची सावली
पोळत्या जिवांना पोटाशी धरते
वहिनीसाहेब !
सुखाचे आगर मायेचे माहेर
देह तुळशीचा वसा चंदनाचा
शब्द करुणेचा शोधी ओठांवर
समई होऊन संसारी नांदते
पक्षीण होऊन पिलांना पाहते
गावाची माउली वडाची सावली
पोळत्या जिवांना पोटाशी धरते
वहिनीसाहेब !
गीत | - | संदीप खरे |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी, साधना सरगम |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- वहिनीसाहेब, वाहिनी- झी मराठी. |
आगर | - | वसतिस्थान. |