A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वनी एकटी दमयंती

काय विधीची दैवगती, वनी एकटी दमयंती

कोमल शय्या मृदुल तृणांची
श्रमवी काया दमयंतीची
व्याकुळ नयने शोधित राही प्राणविसावा निषधपती

कोठे असशी प्राणवल्लभा
दीप तू सख्या, मी तुझी प्रभा
हाक ऐकुनी येशिल का रे? विनवी अजुनी किती?

किंचित खुलली नयनपाकळी
पण नव्हता नलराजा जवळी
अश्रू विरही झरती गाली, शिणवी अपुले नयन किती?
गीत - गंगाधर महाम्‍बरे
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- दशरथ पुजारी
राग / आधार राग - दरबारी कानडा
गीत प्रकार - भावगीत
निषद - नल राजाचा देश.
वल्लभ - पती / प्रिय.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.