A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाटेवरी मोगरा

काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्‍न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा !

हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा
त्यात वाटेवरी मोगरा !

पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा
त्यात वाटेवरी मोगरा !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  वैशाली सामंत, स्वप्‍नील बांदोडकर