वायुसंगे येई श्रावणा
वायुसंगे येई श्रावणा
जलधारांची छेडित वीणा
सप्तस्वर ते तव बरसाती
मैफल अपुली मधु रंगविती
रिमझिमती लय तालच देईल समिरांच्या पैंजणा
मंगल पहिल्या प्रसन्न प्रहरी
झरझरता सर तुझी हासरी
चैतन्याची दिसेल कांती सोनियाच्या दिना
भिजवुनी क्षण जीवनवर्षाचे
मयूर नर्तन बघ हर्षाचे
चढण तुझी जा चढुनी पाहुनी इंद्रधनूच्या खुणा
जलधारांची छेडित वीणा
सप्तस्वर ते तव बरसाती
मैफल अपुली मधु रंगविती
रिमझिमती लय तालच देईल समिरांच्या पैंजणा
मंगल पहिल्या प्रसन्न प्रहरी
झरझरता सर तुझी हासरी
चैतन्याची दिसेल कांती सोनियाच्या दिना
भिजवुनी क्षण जीवनवर्षाचे
मयूर नर्तन बघ हर्षाचे
चढण तुझी जा चढुनी पाहुनी इंद्रधनूच्या खुणा
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | वीणा चिटको |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
समीर | - | वायू. |