A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेचिते कळी कळी

वेचिते कळी कळी पारिजातका तळी
शोधिते फुलाफुलांत श्याम मूर्ति सावळी

कललेली अर्धरात्र फुललेले गात्र-गात्र
स्वप्‍नांना जागवीत चंद्रकोर रंगली

दंव-ओला आसमंत वायुलहर मंद-संथ
धुंद गोड संभ्रमात पायवाट दंगली
गीत -
संगीत -
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - चित्रगीत, नयनांच्या कोंदणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.