A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विहीणबाई सांभाळा हो

विहीणबाई सांभाळा हो, दिला पोटचा गोळा
लेक समजुनी तिजला अपुली मायापाखर घाला

गरीब आम्ही, धनदौलत ना जरी आमुच्या घरी
उणा न केव्हा परि जिव्हाळा मायेचा अंतरी
चुकले जर का लहान अजुनी, राग ना धरावा

दिनरात राबवा परि मायेचा हात पाठिवर फिरवा
सासू? छे ! - तुम्हीच आता तिला आईच्या ठायी
पदरात घातली नउमासांची सारी पुण्याई
आवर आसू मुली, सुखाने घरी आपुल्या जा
भाग्यवती हो, औक्षवती हो, आशीर्वाद हा माझा
ठाय - स्थान, ठिकाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.