A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विजयपताका श्रीरामाची

विजयपताका श्रीरामाची,
झळकते अंबरी
प्रभु आले मंदिरी

गुलाल उधळून नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे
गुढ्यातोरणे घरोघरी ग

आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळती नारी

श्रीरामाचा गजर होउनी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्तियुगाची ललकारी ग
गीत - योगेश्वर अभ्यंकर
संगीत - बाळ माटे
स्वर- माणिक वर्मा
राग / आधार राग - भूप, नट
गीत प्रकार - राम निरंजन, भावगीत
ललकार - चढा स्वर / गर्जना.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.