अशी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे !
बहरली वीज देहात
उतरले प्राण पायात
वार्याचा धरुनी हात,
अशी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे !
मन वेडे जेथे जाय
ते जवळी होते, हाय
अर्ध्यात लचकला पाय,
तरी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे !
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | जानकी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
'मी सोडुन सारी लाज, अशी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे !'
अनुवाद ही देखील एक प्रकारे 'नवनिर्मिती' असते. इथे नुसता शब्दार्थ आणायचा नसतो. त्या मागचा भाव आपल्या मातीत मुरून पुन्हा जन्मावा लागतो. 'इतना जोर से नाची आज' पेक्षा 'अशी बेभान नाचले आज' ह्या ओळीतल्या छटा अधिक गहिर्या आहेत. या मराठी गाण्याचा पुढचा सगळा प्रवास संपूर्ण माझा आणि त्यामुळे स्वतंत्र आहे.
'बहरली वीज देहांत; उतरले प्राण पायांत.. वार्याचा धरुनी हात, अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे !'
आज जेव्हा जेव्हा मी ह्या शब्दांकडे मागे वळून पाहतो, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर; 'गाईड'मधली 'आज फीर जिने कि तमन्ना है। आज फीर मरने का इरादा है।' म्हणणारी वहिदा उभी राहते.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.