विश्वनाट्य सूत्रधार
विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा
चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा
सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमिरी
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा
मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा
कुंचला न तव करांत, तरीही तूच रंगनाथ
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा
चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा
सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमिरी
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा
मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा
कुंचला न तव करांत, तरीही तूच रंगनाथ
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी, पं. राम मराठे, रामदास कामत |
नाटक | - | शाब्बास बिरबल शाब्बास |
राग | - | शंकरा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • नांदी. |
कुंचला | - | रंग देण्याचा ब्रश. |
कशिदा | - | वस्त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम. |
चातक | - | एक पक्षी. प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. इतर पक्ष्यांप्रमाणेच चातक जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो. |
रमा | - | लक्ष्मी. |