या बाइ या
या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.
ऐकुं न येतें,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.
डोळे फिर्विते,
टुलुटुलु कशि माझि सोनि बघते.
बघा बघा तें,
गुलुगुलु गालांतच कशि हंसते.
मला वाटतें,
इला बाई सारें कांहिं सारें कळतें.
सदा खेळते,
कधिं हट्ट धरुन न मागे भलतें.
शाहणि कशी,
साडिचोळि नवी ठेवि जशिच्या तशी.
बघा बघा कशि माझि बसलि बया.
ऐकुं न येतें,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.
डोळे फिर्विते,
टुलुटुलु कशि माझि सोनि बघते.
बघा बघा तें,
गुलुगुलु गालांतच कशि हंसते.
मला वाटतें,
इला बाई सारें कांहिं सारें कळतें.
सदा खेळते,
कधिं हट्ट धरुन न मागे भलतें.
शाहणि कशी,
साडिचोळि नवी ठेवि जशिच्या तशी.
गीत | - | कवी दत्त |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | फैयाज, साधना सरगम |
गीत प्रकार | - | बालगीत, कविता |
टीप - • काव्य रचना- १८९७. • ही कविता कवी दत्तांनीं आपल्या भाचीच्या बाहुलीस उद्देशून लिहिली आहे. |