A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या मीरेचे भाग्य उजळले

या मीरेचे भाग्य उजळले
गिरिधर माझ्या स्वप्‍नी आले

आळवीत मी होते भजनी
देखियले नव्हते नयनांनी
आज मला ते सौख्य लाभले

व्यथा मनाची आता सरली
जननिंदेची भीती नुरली
भवसागर मी तरले तरले

मीरेसंगे नाचे मोहन
तालही धरिती पायी पैंजण
रात संपली केव्हा नकळे