A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या रे या सुजन

या रे या सुजन, आपण सारेजण करूया भजन
भजन भजन भजन

दुरित हरण हरिचे चरण करूया स्मरण
स्मरण स्मरण स्मरण

ध्रुव चिलया प्रह्लादानी गाईली भक्तीची गाणी
प्रभु केला वश भजनानी
काया-वाचा-मन, जाऊ सारेजण, प्रभुला शरण
शरण शरण शरण

वाजवू भक्तीचा डंका, प्रभुसी मारू हाका
मग नाही यमाचा धोका
होवू या पावन, आपण सारेजण करुनी भजन
भजन भजन भजन
दुरित - पाप.
प्रह्लाद - हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले.