A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या विराट गगनाखाली

या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे

काजळी खोल डोहात, डहुळलो धुंद मोहात
वासनेत अन्‌ जळताना चांदण्यात विझलो आहे

स्वर सनई वनवार्‍याची, वर यात्रा शत तार्‍यांची
मी प्रकाश पिउनी आता प्राणातून सजलो आहे
तृण - गवत.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.