यश हे अमृत झाले
यश हे अमृत झाले
सुख स्वर्गीचे आले
दिग्विजयाच्या मनोरथावर
नक्षत्रांचे झुलते अंबर
मागेपुढती राजपथावर
लक्ष दीप लागले
स्तुतिसुमनांचे उधळित झेले
जनगौरव तो जय जय बोले
कीर्तध्वजावर लावून डोळे
भाग्य पुढे चालले
वैभव मिरवीत मंदिरी येता
दिसेल डोळी ती मंगलता
सुख अंधारी मन व्याकुळता
दु:ख सुखे हासले
यश हे अमृत झाले
सुख स्वर्गीचे आले
परि दु:ख सुखे हासले
सुख स्वर्गीचे आले
दिग्विजयाच्या मनोरथावर
नक्षत्रांचे झुलते अंबर
मागेपुढती राजपथावर
लक्ष दीप लागले
स्तुतिसुमनांचे उधळित झेले
जनगौरव तो जय जय बोले
कीर्तध्वजावर लावून डोळे
भाग्य पुढे चालले
वैभव मिरवीत मंदिरी येता
दिसेल डोळी ती मंगलता
सुख अंधारी मन व्याकुळता
दु:ख सुखे हासले
यश हे अमृत झाले
सुख स्वर्गीचे आले
परि दु:ख सुखे हासले
| गीत | - | पी. सावळाराम |
| संगीत | - | वसंत प्रभु |
| स्वर | - | तलत महमूद |
| चित्रपट | - | पुत्र व्हावा ऐसा |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| झेला | - | गुच्छ / नक्षी. |
| सुमन | - | फूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












तलत महमूद