A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यतिमन मम मानित त्या

यतिमन मम मानित त्या
एकल्या नृपाला ।
आदिअंत ज्यास नसे
त्या सनातनाला ॥

गगनधरा ज्या निवास
बंधन भय नाहि त्यास
समिर करिल काय नमन
सधन सागराला ॥
आदि (आधी) - प्रारंभ / प्रमुख.
नृप - राजा.
यति - संन्यासी.
सनातन - शाश्वत, चिरकाल.
समीर - वायू.