A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यायचे होते फुलून

यायचे होते फुलून
तो ऋतू गेला निघून

मागतो अधिकार साधा
पाहू दे तुजला दुरून

राहिल्या त्या शंख-शिंपा
लाट गेली ओसरून

तूच माझे सर्व काही
मी तुझा कोणी नसून

का सुरू झाली कळेना
ही कहाणी शेवटून