ये रे ये रे पावसा रुसलास
ये रे ये रे पावसा, रुसलास का?
माझ्याशी गट्टी फू केलिस का?
झर झर झर तू येणार कधी?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का?
गार गार वार्यात नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेची टाळी मला देतोस का?
धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड् गड् गड् आता हसतोस का?
माझ्याशी गट्टी फू केलिस का?
झर झर झर तू येणार कधी?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का?
गार गार वार्यात नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेची टाळी मला देतोस का?
धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड् गड् गड् आता हसतोस का?
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | रचना खडीकर |
गीत प्रकार | - | बालगीत, ऋतू बरवा |