A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येणार तू येणार तू

तुझिया स्वागता उभी समोरी, पाहुनी हसणार तू -
येणार तू, येणार तू !

अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते, उगा तयातून येणार तू -
येणार तू, येणार तू !

साडी ल्याले आज अबोली
तुझी आठवण जागी झाली
वसंत फुलला शिशिराकाळी, मुकेपणी वदणार तू -
येणार तू, येणार तू !

दर्पणात या तुला पाहते
तुझीच प्रतिमा हृदयी ठसते
तुझ्या संगती गाली हसते, मला कधी मिळणार तू?
येणार तू, येणार तू !
गीत- रवींद्र भट
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट- ते माझे घर
गीत प्रकार - चित्रगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  सुमन कल्याणपूर