येणे-जाणे का हो सोडले
येणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
लागू नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
मानिती मला मामंजी, मानतो गाव
चालते खालती बघुन, जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
ध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा
ओसाड जुने देऊळ, पांढरा चाफा
तुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
लागू नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
मानिती मला मामंजी, मानतो गाव
चालते खालती बघुन, जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
ध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा
ओसाड जुने देऊळ, पांढरा चाफा
तुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | लाखात अशी देखणी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
परता | - | पलीकडचा. |
सोपा | - | ओवरी, ओटा. |