A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येशिल कधी परतून

येशिल कधी परतून?
जिवलगा, येशिल कधी परतून?

वाट पाहू किती? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन

हिरवे सोने हे दसर्‍याचे हाती जाइ सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला? गेले बाई भिऊन
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरि ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !

 

  आशा भोसले, लता मंगेशकर
लता मंगेशकर, आशा भोसले