अखेरचा हा तुला दंडवत
अखेरचा हा तुला दंडवत
सोडून जाते गाव
दरीदरींतून मावळदेवा
देऊळ सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले हसले
कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले
उरलं मागं नाव
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता
धरती दे ग ठाव
सोडून जाते गाव
दरीदरींतून मावळदेवा
देऊळ सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले हसले
कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले
उरलं मागं नाव
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता
धरती दे ग ठाव
गीत | - | कवी संजीव |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | मराठा तितुका मेळवावा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
टीप - • प्रतिध्वनी- उषा मंगेशकर, मीना खडीकर. |
कपार | - | खबदड. |
शिवार | - | शेत. |
मराठा तितुका मेळवावा” या चित्रपटातल्या 'अखेरचा हा तुला दंडवत' या गाण्यात दीदीला दर्याखोर्यांध्ये घुमणार्या आवाजाचा परिणाम हवा होता. तिनं 'तुला दंडवत' गायलं की पाठोपाठ तिच्याच आवाजाचे प्रतिध्वनी उठावेत अशी कल्पना होती. पण असा परिणाम साध्य करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हतं. मग तिनं मला आणि उषाला तिच्या मागे घोड्याथोड्या अंतरावर गायला उभं केलं. तिनं 'तुला दंडवत' गायलं की आम्हीही ते शब्द तिच्या पाठोपाठ तालात गायचो. आजही ती रेकॉर्ड ऐकताना तो तिचाच प्रतिध्वनी वाटतो.
आम्ही आहोतच दीदीचे प्रतिध्वनी.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.