A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अलवार तुझी चाहूल

अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर

तू असता कोठे दूर, अंगणी इथे हुरहूर
मेघांविण बरसे ऐसा मनी आठवणींचा पूर

मी रुसले अन्‌ तू हसुनी केसांत माळले फूल
हिंदोळ्यावरती झुलता लडिवाळ तुझे रे बोल

घन वादळवार्‍यातून मी जपले सारे सूर
कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर

अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर
गीत- अजेय झणकर
संगीत - आनंद मोडक
स्वर - कविता कृष्णमूर्ती
चित्रपट- सरकारनामा
गीत प्रकार - चित्रगीत
काहूर - मनातील गोंधळ, बेचैनी.
कोंदण - दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण.
हिंदोल (हिंडोल) - झुला, झोका.

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  कविता कृष्णमूर्ती