A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बलसागर तुम्हि वीरशिरोमणि

बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठें तरि रमलां ।
आश्वासन जिस दिलें तिला कां विसरुनियां गेलां ॥

पेरियलें जें प्रीतितरूचें बीज हृदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ॥

सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥

पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला ।
निश्चय माझा नढळे जरि हा कंठ कुणीं चिरला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- माणिक वर्मा
नीलाक्षी जोशी
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - पिलू
ताल-धुमाळी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• राग: पिलु, ताल-धुमाळी
बलसागर तुम्हि वीर.. ठाव न अन्याला

• राग: सदर, ताल-सदर
पांडुकुमारा पार्थ.. कुणीं चिरला

पृथक्‌

तच्छाया- तत्‌ + छाया.
 

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  माणिक वर्मा
  नीलाक्षी जोशी
  आशा खाडिलकर