A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भारतमाता परमवंद्य धरा

भारतमाता परमवंद्य धरा
मायभू आमुची, कोटी बांधव हे आम्ही

आणुनिया पावन सुरसरिता श्रमगंगा
म्लानमुखी स्मित कमळे फुलवू

विविध जरी भाषा, भिन्‍न धर्मदिशा
प्रगति पंथ तरी एक असे
येउ दे अंधार वा वादळी असु दे हवा
चाललो ध्येयाकडे

मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू

सळसळत्‍या सोनेरी शेतातुनी
कसणार्‍या बाहूंची संजीवनी
आमुच्या कामातुनी घामातुनी रक्तातुनी
निपजो सुजल धरा सुफल धरा
उसळुन ये कष्टांची आराधना
धगधगत्या लोहाच्या ज्वालेतुनी

निज शक्तीविण आम्‍हा आधार दुजा नाही
अमुच्याच प्रयत्‍नांची आम्‍हास खरी ग्‍वाही