A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भूमातेच्या कुशीतला हा

भूमातेच्या कुशीतला हा अमुचा कोकण देश
डोंगराळ अन् चिकणमातीचा श्रमवंतांचा देश

निसर्गाच्या संपत्तीचे याच्या हृदयी झरे
दौलत लुटवी उदार हस्ते देण्या पुढती सरे
संजीवनी औषधी तरू-लता गंधगुणे फुलती
नारळ-कोकम-फणस-सुपारी-करवंदे पिकती
अंबे-केळी-काजू-रामफळ अमोल संपत्ती
परशुरामश्री विंध्यवासिनी ह्या क्षेत्री वसती
डोंगर-किल्ले स्फूर्तिदायी वीरांचे अवशेष

तांबडमाती ताना-येसा श्री शिवतेजाची
समाधान कष्टांची भूमी, समता ज्ञानाची
सावित्री वसिष्ठी शरावती जलनिधी वैभव हे
लोकजीवनी या संजीवनीसंगे मन वाहे
पयधारांनी भिजली कणकण नटली ही धरती
वैतरणा-कोयना-तानसा अमृतमय वाहती
सातत्याने काम करा रे हा त्यांचा संदेश

मराठ-कुणबी साधा भोळा तुकयाची वृत्ती
सुदूरदर्शी राजकारणी रामदासी वृत्ती
मातृभूमीवर शत्रू येउनी उगारील हात
कोटी हस्त तयांवर पडतील तोडाया हात
निधडे सैनिक पुढे धावती वीरांचा आवेश
निधड - पराक्रमी.
पय - पाणी / दूध.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.