A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छळि जीवा दैवगती अती

छळि जीवा दैवगती अती,
शिरीं घाली घाव कुठार ती.

शशि-सूर्य गगनिं प्रकाशती,
परि राहु-केतु त्यां ग्रासती,
जन जगीं तशीं, दु:ख साहती !
कुठार - कुर्‍हाड.
देवमाणूस हें नाटक रंगभूमीवर येऊन आज जवळजवळ दीड वर्ष होत आलें आहे. काहीं अपरिहार्य कारणांमुळें हें नाटक माझ्या वाचकांसमोर आणायला मला कालावधि लागला.

देवमाणूस या नाटकाच्या प्रयोगाच्या यशस्वितेला माझ्या व्यवसाय-सहाध्यायांनीं बहुमोल मदत केली आहे. अर्थात्, आज या शुभप्रसंगीं त्यांच्या नावांचा उल्लेख करणें अनुचित दिसणार नाहीं, असें वाटल्यावरून माझ्या वाचकांशी मी त्यांचा परिचय करून देतों.

श्री. छोटा गंधर्व (सौदागर) यांनीं या नाटकांतली संगीताची बाजू उत्‍कृष्टपणानें सांभाळून नाटकांतली पद्यरचनासुद्धां त्यांनीच केली असल्यामुळे रचना केली असल्यामुळे प्रथम त्यांचे आभार मानतों.

ज्या नटवर्गानें या माझ्या 'देवमाणूस' नाटकाला आज कीर्तीच्या शिखरावर नेऊन पोचवण्याकरता अविश्रांत परिश्रम केले, त्या कलाविकास नाट्यशाखेच्या सर्व नटवर्गाचे आणि सरते शेवटी हें नाटक अल्पावधित प्रकाशित केल्याबद्दल मॉडर्न बुक डेपोचे मालक श्री. भिडे यांचे आभार मानतो.
(संपादित)

नागेश जोशी
'देवमाणूस' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मॉडर्न बुक डेपो प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.