A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांदभरली रात आहे

चांदभरली रात आहे
प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची
मखमली बरसात आहे

मंद वाहे गंधवारा
दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातुन
जीव-नौका जात आहे

ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या
साजणाचा हात आहे