चांदण्याच्या सागरात बुडले
चांदण्याच्या सागरात बुडले हे गाव
अन् चंदेरी दर्यात डुबते ही नाव
विखुरलं जिथंतिथं माणिकमोती
जाईजुई चमेलीच्या परड्या भवती
मंद अति थंडगार सुटला वारा
अन् मन-सुमनांचा बहर आला बहरा
वसंत फुलला, जगी ही फुलराणी आली
गुंजारव मधुकर हा गुणगुणगुण घाली
वल्हवीत नाव करी शरसंधान
अन् एकजीव झालं पडले नवे बंधन
अन् चंदेरी दर्यात डुबते ही नाव
विखुरलं जिथंतिथं माणिकमोती
जाईजुई चमेलीच्या परड्या भवती
मंद अति थंडगार सुटला वारा
अन् मन-सुमनांचा बहर आला बहरा
वसंत फुलला, जगी ही फुलराणी आली
गुंजारव मधुकर हा गुणगुणगुण घाली
वल्हवीत नाव करी शरसंधान
अन् एकजीव झालं पडले नवे बंधन
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | सरस्वतीबाई राणे |
गीत प्रकार | - | भावगीत, शब्दशारदेचे चांदणे |
गुंजारव | - | भुंग्याचा गुणगुण नाद. |
मधुकर | - | भ्रमर, भुंगा. |