A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांदण्याची रोषणाई

चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते
मी सुधेच्या सागरी त्या नाहते पण नाहते

मी न बघते आमराई, फुलवरा चैत्रातला
कोकिळेचे गीत पण मी काळजाने ऐकते

रंगरेषा ताटव्यातील पारख्या सार्‍या मला
मोहिनी गंधातुनी ती जीवनावर वाहते
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.
कलाक्षेत्रात वि. वा. शिरवाडकरांचे एक दैवत शेक्सपीयर तर दुसरे चार्ली चाप्लीन. विसाव्या शतकाच्या इतिहासात चार्ली चाप्लीनच्या ट्रॅम्प (भटक्या) चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्या ट्रॅम्पचा देशी अवतार 'विदूषक'मधील बगाराम.

बगाराम ह्या मानसपुत्राचे चित्र रंगवताना शिरवाडकरांनी हास्य आणि कारुण्य यांचा सुरेख मिलाफ घडवून आणला आहे. ह्या नाटकातील विनोदी प्रवेश रंगभूमीवर अत्यंत प्रभावी ठरतील; त्याच वेळी ह्या विदूषकी ढंगाच्या गरीब बिचार्‍या माणसाचे दुःख अंतःकरणाला जाऊन भिडेल. काव्यात्मता हा शिरवाडकरांच्या नाट्यलेखनाचा एक विशेष. ही काव्यात्मता ह्या सबंध नाटकाला भारून टाकते. नाटकातील संवादांतून जीवनविषयक नवीन दृष्टिकोण देण्याची ताकद शिरवाडकरांच्या लेखणीत आहे. 'विदूषक'मधील अनेक संवाद आपल्याला पुनःपुन्हा आठवत राहतील.
(संपादित)

'विदूषक' नाटकाच्या 'शिरवाडकर जन्‍मशताब्दी विशेष' आवृत्तीच्या मलपृष्ठावरून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.