दाटतो हृदयी उमाळा
दाटतो हृदयी उमाळा खोल फुटतो हुंदका
प्राण कंठी येती तरीही ओठ माझे बंद का?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक अता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा
नाकारित माझे मज कोठवरी राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
या जगात वार्यावर सोडिले तुला मी
स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी
रात्रंदिन सलत व्यथा सांग कशी साहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
प्राण कंठी येती तरीही ओठ माझे बंद का?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक अता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा
नाकारित माझे मज कोठवरी राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
या जगात वार्यावर सोडिले तुला मी
स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी
रात्रंदिन सलत व्यथा सांग कशी साहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | सी. रामचंद्र |
चित्रपट | - | घरकुल |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सल | - | टोचणी. |