धेनूपासून नका पाडसा
धेनूपासून नका पाडसा दूर असे नेऊ
मुनिवरा, अदय नका होऊ
वेलीवर या फूल वाढले
वत्सलतेचे जल त्या दिधले
आता कुठे गंधात दंगले,
त्यास कसे देऊ
आघातच हा दुर्दैवाचा
कळतो ना मज अर्थ जिण्याचा
काळिज मागा पण मातेचा
पुत्र नका नेऊ
मुनिवरा, अदय नका होऊ
वेलीवर या फूल वाढले
वत्सलतेचे जल त्या दिधले
आता कुठे गंधात दंगले,
त्यास कसे देऊ
आघातच हा दुर्दैवाचा
कळतो ना मज अर्थ जिण्याचा
काळिज मागा पण मातेचा
पुत्र नका नेऊ
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | आशालता वाबगावकर |
नाटक | - | कैकेयी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी’ हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे. |
धेनु | - | गाय. |
वत्सल | - | प्रेमळ. |