A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ध्वज उंच तिरंगा डोले

ध्वज उंच तिरंगा डोले, तो रविचंद्राशी बोले

कुणि लढता लढता पडले
कुणि फासावरती चढले
यश त्यांचे गगना भिडले, का डोळे करिता ओले

जनहृदया बंधन कसले
चैतन्य असे रसरसले
हे श्रेय अलौकिक असले, लाभले जिवाच्या मोले

स्वातंत्र्य बंधुता समता
शांतता अहिंसा ममता
यांच्यास्तव हिंदी जनता ध्वज भुजदंडावर तोले
गीत - वसंत बापट
संगीत -
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.