दिन गेले भजनाविण सारे
दिन गेले भजनाविण सारे
बालपणा रमण्यात गमविला यौवनात धन लौकिक प्यारे
मोहापायी मूळ हरपलें अजून शमेना तृष्णा कां रे
म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभुचे तरले सारे
बालपणा रमण्यात गमविला यौवनात धन लौकिक प्यारे
मोहापायी मूळ हरपलें अजून शमेना तृष्णा कां रे
म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभुचे तरले सारे
गीत | - | पुरुषोत्तम दारव्हेकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वराविष्कार | - | ∙ भार्गवराम आचरेकर ∙ शौनक अभिषेकी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | कट्यार काळजात घुसली |
राग | - | बिलावल |
ताल | - | धुमाळी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • हे पद हा संत कबिराच्या 'बीत गये दिन भजनविना' या भजनाचा नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी केलेला स्वैर अनुवाद आहे. |
तृष्णा | - | तहान. |