दिन तैसी रजनी झाली गे
दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥
पडिलें दूरदेसीं, मज आठवे मानसीं ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला, अजून कां न ये ॥३॥
गरुडवाहना गुणगंभीरा, येईं गा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा, श्रीविठ्ठला ॥४॥
पडिलें दूरदेसीं, मज आठवे मानसीं ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला, अजून कां न ये ॥३॥
गरुडवाहना गुणगंभीरा, येईं गा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा, श्रीविठ्ठला ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ किशोरी आमोणकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • ही संत ज्ञानेश्वर यांच्या 'पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं’ या विराणीची संस्कारित आवृत्ती आहे. • स्वर- आशा भोसले, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर. • स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर. |
अवस्था | - | उत्कंठा. |
भावार्थ-
परमेश्वर दर्शन देत नाही आणि त्याच्या भेटीची तर तळमळ लागून राहिली आहे अशी भावस्थिती ज्ञानेश्वरांच्या या अभंगांमधून प्रकट होते.
परमेश्वरापासून आपण दूर पडलो आहोत आणि वियोगामुळे सारा जीव पोखरून निघत आहे. परमेश्वरानेच आपाल्याला असे वेडे केले आणि अजून येत नाही. त्यामुळे दिवसही काळोख होऊन गेला. तेव्हा परमेश्वरा, लवकर दर्शन दे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.