उजळीत आशा, हसलीस तू
उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होऊनिया आलीस तू
जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे केलेस तू
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
त्याचा अनामी स्वरभास तू
जन्मांत लाभे क्षण एकदा हा
ते भाग्य माझे झालीस तू
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | सुधीर फडके |
राग | - | देस, तिलककामोद |
गीत प्रकार | - | भावगीत |
तात्या (जे. एल.) रानडे (माझे पहिले गुरू) यांनी जेव्हा ती गाणी ऐकली त्यावेळी मला ते म्हणाले, "राम, छान गायला आहेस. माझ्या काही उत्तम गाण्यांइतकी सरस तुझी गाणी वठली आहेत. एक मात्र लक्षात ठेव, की अशा पदवजा गाण्यांचा जमाना संपत आला आहे. श्रोते भावगीतांकडे झुकताहेत."
मी त्यांचा सल्ला पुरेपूर ऐकला. या ध्वनिमुद्रिकेकरिता मला मिळालेलं मानधन होतं रु. ३०. काव्य, संगीत नियोजन आणि गायन सगळं त्यात आलं. तो जमानाच निराळा होता. सुधीर फडके यांच्याकडूनही मला कळलं, की ते ज्या ज्यावेळी एचएमव्ही करिता चाली करीत त्या त्यावेळी त्यांना एका गाण्यामागे रु. १५ मिळायचे. गायकांकडून गाणं बसवून घेणं, ध्वनिमुद्रणाचे वेळी हजर राहणं आणि अधिकार्यांनी गाणं पास करणं, या सगळ्या गोष्टी पार पडल्यावरच पैसे हाती यायचे.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.