A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
डोलत डोलत टमकत

डोलत डोलत टमकत चाले ।
गोजिरीं पाउलें टाकूनियां ॥१॥

पायीं रुणझुण वाजतात वाळे ।
गोपी पाहातां डोळे मन निवे ॥२॥

सांवळें सगुण मानस मोहन ।
गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥
टमकत - दुर्लक्ष करुन, बेफिकीरपणे टमकत चालणारा
निवणे - शांत होणे.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
रंजवण - मनाचे रंजन करणारे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.