A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घेई घेई माझे वाचे

घेई घेई माझे वाचे ।
गोड नाम विठोबाचें ॥१॥

डोळे तुह्मी घ्या रे सुख ।
पहा विठोबाचें मुख ॥२॥

तुह्मी ऐका रे कान ।
माझ्या विठोबाचें गुण ॥३॥

मना तेथें धांव घेई ।
राहें विठोबाचे पायीं ॥४॥

रूपीं गुंतले लोचन ।
पायीं स्थिरावले मन ॥५॥

देहभाव हरपला ।
तुज पाहता विठ्ठला ॥६॥

तुका ह्मणे जीवा ।
नको सोडूं या केशवा ॥७॥
नोंद
तुकाराम गाथेनुसार खालील दोन अभंग या संत तुकारामांच्या दोन स्वतंत्र रचना आहेत.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुह्मी घ्या रे डोळे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥४॥
तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥५॥

रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥२॥
कळों नये सुखदुःख । तान हरपली भूक ॥३॥
तुका ह्मणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥४॥

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.