A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोमू तुझे नादानं गो

गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला
गोमू तू होशील का होशील का होशील काय गो नाखवीन

गल्यान्‌ची बोरमाल तुला मी करीन
पायांचे वाले तुला मी हाणीन
होशील का होशील का होशील गावची पाटलीन
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला

गोमू तुझे डोक्यानं गो ह्यो गजरा न्‌ पोरांच्या लागल्यान्‌ नजरा
गोमू आपले दोघांचा गो ह्यो जोरा न्‌ दिसेल सोबून बरा
माथ्यान्‌ जाईजुईचा ह्यो झेला, काय बोलतो ह्यो मेला
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला

अंबर नंबर बोलते शंभर नंबर तुझे लुगर्‍याला
लागलाय्‌ डांबर तुझे लुगर्‍याला लागलाय्‌ डांबर
आवर सावर मेल्या बघतंयस कवार पोरी जेसनन गो
हाये सुंदर पोरी जेसनन गो हाये सुंदर
तुझे चोलीला सोन्याची जर पोरी, चालनेन्‌ गो
पहिला नंबर पोरी चालनेन्‌ गो पहिला नंबर
तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला
गीत - पारंपरिक
संगीत - मधुकर पाठक
स्वर- पांडुरंग वनमाली
गीत प्रकार - कोळीगीत