A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे बंध रेशमाचे

पथ जात धर्म किंवानातेही ज्या न ठावे
ते जाणतात एकप्रेमास प्रेम द्यावे
हृदयात जागणार्‍याअतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीहीहे बंध रेशमाचे !
 
विसरून जाय जेव्हामाणूस माणसाला
जाळीत ये जगालाविक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेहीधर्मांध आक्रमाचे
तुटतील ना कधीहीहे बंध रेशमाचे !
 
हे बंध रेशमाचेठेवी जपून जीवा
धागा अतूट हाचप्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांनादेती पराक्रमाचे
तुटतील ना कधीहीहे बंध रेशमाचे !